Sri Guru Gobind Singh Ji Maharaj श्री गुरु गोबिंदसिंघजी यांनी धर्म, देश आणि संस्कृति रक्षणार्थ आपले वडील, आई आणी चार मुलांचे बलिदान श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांची दि. २७ रोजी जयंती आहे, त्यानिमित्त हा लेख. दिले. त्यांनी अन्याय-अत्याचाराविरुद्ध धर्मयुद्ध सुरु केले आणी भारत देशात त्याकाळात होणाऱ्या धर्मपरिवर्तन अभियानाविरुद्ध एक सेनापति म्हणून मोठी लढाई लढली. एक-दोन नाही तर जवळपास सोळा लढाया लढून त्यांनी सामान्य आणि निर्बल जनतेची रक्षा केली.
श्री गुरू गोबिंद सिंघजी महाराज Sri Guru Gobind Singh Ji Maharaj
श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज Sri Guru Gobind Singh Ji Maharaj यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी बिहार राज्याच्या पाटना शहरात झाला होता. त्यांचे वडील गुरु तेगबहादरजी शीख पंथाचे ९ वें गुरु होते. त्यांच्या आईचे नाव माता गुजरीजी होते. गुरुजीं यांचे वय नऊ वर्षे असतांना त्यांचे वडील गुरु तेगबहादर हे धर्मरक्षणार्थ दिल्ली येथे शहीद झाले. वडिलांना शहीदीसाठी (बलिदानासाठी) गुरु गोबिंद सिंघजी यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली होती. काश्मीरी पण्डितांचा धर्म वाचविण्यासाठी सन १६७५ मध्ये गुरु तेगबहादर यांचे बलिदान झाले होते. गुरु गोबिंदसिंघजी यांच्या शब्दात, त्यांच्या वडिलांचे बलिदान ‘तिलक’ आणि जनेऊ’ रक्षणार्थ झाले होते. योगायोगाने हे वर्ष (२०२५ – २६) श्री गुरु तेगबहादरजी यांच्या हौतात्म्याचे ३५० वें वर्ष (साडे तीन शताब्दी) म्हणून जगभर पाळले जात आहे..
शीख पंथाच्या गुरूगादीवर दहावे गुरू म्हणून ओळख निर्माण करणारे श्री गुरू गोबिंदसिंघजी यांना अवघ्या नवव्या वयात गुरूपद मिळाले होते. कोवळ्या वयात वडिलांच्या हौतात्म्यानंतर भारतभर विस्तृत शीख पंथ सांभाळत असतांना गुरुजींनी स्वतःला संत आणी एक सेनापति म्हणून जनुपाधि मिळवली. त्यांनी शास्त्र आणी शस्त्र यांना समान सन्मान दिला. एकीकडे त्यांनी विविध भाषा आणि धर्माचे अभ्यास करत श्री दशम ग्रन्थसाहिबच्या गुरुबाणीची रचना केली. सोबतच ध्यान, तपस्या आणि भक्ती केली. तर दुसरीकडे त्यांनी शीख पंथाला सैन्य प्रशिक्षण उपलब्ध करुन देत धर्म रक्षणार्थ, अन्याय अत्याचाराविरुद्ध प्रतिकार करत वेगवेगळे सोळा युद्ध देखील लढलेत. गुरुजींचे वय फक्त ४२ वर्षे ९ महीने एवढे होते. अल्पवयात त्यांनी जे साध्य केले ते एखाद्या सामान्य माणसासाठी अशक्यच आहे. गुरू गोबिंदसिंघजी यांच्या गुरूपद काळात त्यांनी सन १६९९ मध्ये शीख पंथाचे खालसा पंथात केलेले धर्माविष्कार एक मोठी उपलब्धि आहे. या मुळे पंथाला लढण्याची, संघर्ष करण्याची नवी दिशा प्राप्त झाली.
शीख धर्माचे पंचम गुरु श्री अर्जनदेवजी हे पंथातील पाहिले हौतात्म्य होते आणी ते गुरू गोबिंद सिंघजी यांचे ते पंजोबा होत. गुरु तेगबहादरजी हे सुद्धा गुरूच्या रुपात हौतात्म्य झाले आणि ते
गुरु गोबिंदसिंघजी यांचे वडील होते. धर्म रक्षणाच्या या धर्मयुद्धा त्यांची माता गुजरीजी, चार सुपुत्र ज्यांना आदराने साहिबजा संबोधण्यात येते, त्यांचे हौतात्म्य झाले. साहबजादा अजी सिंघजी यांचे वय १९ होते जेव्हा त्यांचे युद्धात हौतात्म्य झाले त्यांच्या सोबतच त्यांचे लहान भाऊ साहबजादा जुझारसिंघजी वय १७ वीरगतिस प्राप्त झाले. तर साहबजादा जोरावरसिंघजं वय ९ आणि साहबजादा फतेहसिंघजी हे वयाच्या ७ व्या वर्ष हौतात्म्य झालेत . आपल्या चार पुत्रांच्या बलिदानावर अभिमा करणारे गुरू गोबिंदसिंघजी त्यावेळी म्हणाले होते, इन पुत्रण सिस पर वार दिए सूत चार चार मुये तो क्या हुआ जिवित क हजार म्हणजे, हजारों पुत्र जिवित राहण्यासाठी माझ्या चार पुत्रांच बलिदान मला स्वीकार आहे. अशा मोठ्या मनाचा वीर, गुरु आणि प्रवर्तक इतरत्र कुठेही आढळणे अशक्यच आहे.
शीख धर्माचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंद सिंघजी महाराज Sri Guru Gobind Singh Ji Maharaj यांचा प्रकाशपर्व येत्या दि. २७ डिसेम्बर रोजी सर्वत्र साजर होत आहे. गुरू महाराज यांचा प्रकाशपर्व तिथिनुसार साजर करण्याची प्रथा आहे. यंदा हा प्रकाशपर्व चार साहिबजादा यांच्य शहीद सप्ताहमध्ये येत आहे हे विशेष. त्यावरून कल्पना ये की भारतभूमिवर शीख धर्माचे बलिदान आणि संघर्ष कितं महान आहेत. धर्म, संस्कृति आणी देशासाठी शीख धर्मी गुरू आणि त्यांच्या अनुयायींनी दिलेले योगदान हा एक मोट इतिहास आहे. श्री गुरू गोबिंद सिंघजी महाराज हे त्यांच्य शेवटच्या काळात नांदेडच्या भूमीत आले. येथे त्यांनी श्री गुरु ग्रंथसाहेबांना गुरुगादी प्रदान केली आणी देहधारी गुरुंची प्रथ संपुष्टात आली. नांदेड मध्येच गुरुजींनी परलोकगमन केले म्हणून नांदेड हे एक पवित्र धार्मिक स्थल म्हणून विश्वभर प्रसिब झाले आहे. श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या पाव प्रकाशपर्वानिमित्त विश्वात शांतता नांदावी व बंधूत्वभाव वाढा अशी मंगलमय प्रार्थना करू या.
