The disease called screen time हा, वीस, तीस, चाळीस पन्नास… नव्वद, शंभर आलो रे… येऊ का? मला काय माहित नाही. मी आलो रे…. छोटया मोठ्या गल्लीतून नेहमीच येणाऱ्या या आवाजाची सवय झालेली आमची पिढी कदाचित शेवटचीच भर दुपार असो किंवा दिवसाचा कोणताही प्रहर असो; कोणत्या वेळी कोणते खेळ खेळायचे हे मुलांचे नक्की ठरलेले असायचे. शाळेतून सुटका झाली की घरच्यांना एकदा दर्शन द्यायचे, दातराला त्याची जागा दाखवून द्यायची आणि थेट दिवेलागणीला घरी परतायचे. त्यानंतर मात्र शाळेत काय दिवे लावले याची झाडाझडती. घेतली जायची. तिन्ही संध्याकाळी शुभं करोति, उजळणी असा सगळा परवचाचा भाग असायचा. जेवण उरकल्यानंतर पुन्हा उद्या कोणाकडे कोणता डाव मांडायचा याचं प्लॅनिंग मनातल्या मनात करत झोप कधी लागली ते कळायचेच नाही. घर शाळा मैदान घर याच परिघात बालपण फुलत होतं. दूरदर्शनवर दोनच वाहिन्या होत्या. कार्यक्रमही मर्यादितच असायचे. त्यामुळे स्क्रीन टाइम नावाचा रोग कधी जवळ फिरकलाच नाही.
The disease called screen time | स्क्रीन टाइम नावाचा रोग
मैदानावर वेगवेगळे खेळ खेळले जायचे. लगोरी, विटी-दांडू, कबड्डी, लगंडी, खिपरी, शिवणापाणी, रेषापाणी याशिवाय घरात कॅरम, चंपूल, गाण्यांच्या तसेच विशिष्ट नावांच्या मेंड्या खेळल्या जायच्या. काही अंशी ग्रामीण भागात हे खेळ आजही खेळले जातात. पण जास्त ओढा आहे तो मोबाईलवरील गेम्सचा मोठमोठ्या शहरांत तर मैदाने उरलीच नाहीत. जमीन मोकळी दिसली की तिचा उपयोग इंडस्ट्रीसाठी अधिक चांगला होईल का अपार्टमेंटसाठी याचा विचार केला जातो.बरं अपार्टमेंट बांधताना मुलांना खेळण्यासाठी जागा सोडलेली असते. पण मुले तिथे खेळू शकत नाहीत. कारण मुलांकडे आज तेवढा वेळच शिल्लक नाही. शिवाय क्रिकेट, विटीदांडू यासारखे खेळ खेळले तर घरांच्या गाड्यांच्या काचा फुटण्याची भीती.. त्यामुळे पालकही खेळण्यासाठी परवानगी द्यायला कचरतात. घर शाळा क्लास- घर या परिघात त्यांचे बालपण हरवत आहे. शाळा, क्लास किंवा एकंदर शैक्षणिक क्षेत्रात तर स्पर्धा एवढी वाढलीय की मुलांना त्यात उतरण्याशिवाय पर्याय नसतो. मूल ह्या जीवघेण्या स्पर्धेत उतरले नाही तर ते प्रवाहाच्या बाहेर फेकले जाते. कोणतातरी फार मोठा अपराध केल्यासारखं त्याच्याकडे पाहिलं जातं.
The disease called screen time स्क्रीन टाइम नावाचा रोग
साहजिकच मुलं खेळात वेळ वाया (?) घालवण्यापेक्षा पुस्तकात किंवा मोबाइलमध्ये डोकं घालून बसणं पसंत करतात. मैदानी खेळांमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले रहाते. परंतु आता हे मैदानी खेळ पैसे भरून खेळावे लागतात. आणि ते एक दिवस सुरवंटाची अळी त्या कोशातून बाहेर पडते आणि ती सुंदर, मनमोहक असे रंगीबेरंगी फुलपाखरू बनते. तसंच मुलांनीही आभासी, जीवघेण्या स्पर्धेच्या कोशातून काही वेळ तरी बाहेर पडावं आणि दिवसातून एक तास तरी किमान मोकळ्या हवेत खेळावं. आपले बालपण डिजिटल कोशात गुरफटून न घेता खऱ्या अर्थाने रम्य करावे.
कोश आभासी जगाचा खोरी ताबा घेई बालमनाचा सर्वांना परवडण्यासारखे नक्कीच नाही.
खरं पाहिलं तर आज शिक्षणाच्या बाबतीत खूप सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. खूप वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या आहेत. बदलत्या काळानुसार मुलांनी त्या स्वीकाराव्यात आणि त्यातून वेळ काढून विविध प्रकारचे खेळही खेळावेत. सारखं आभासी जगाच्या संपर्कात राहून मन उदास होते. मनावर ताण येतो. त्यामुळे चार मित्रांसमवेत मन उत्साही राहील असे खेळ खेळले पाहिजेत. सारखं चार भिंतींच्या आत बसण्यापेक्षा मोकळ्या वातावरणात फेरफटका मारायला हवा. पालकांनी सुद्धा आवर्जून मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात नेणे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नात्याने संवाद साधणे, त्यांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे, मैदानी खेळातून शारीरिक क्षमता वाढवणे, संस्कारांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणे असे केले तर ही पिढी सुसंस्कारी होऊन चांगल्या जीवनाचा आनंद घेऊ शकेल.
आजकाल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मोबाईलवर तयारच असते. बहुतांश मुले ही उत्तरे अगदी जशीच्या तशी मुखोद्रत करतात. अगदी निबंधात सुद्धा स्वतःचे विचार मांडून लिहिण्याचा कंटाळा येतो. जिथे स्वतःचे विचार मांडायचे, बुद्धीला चालना द्यायची तिथे आजची बहुतांश पिढी या आभासी जगाचा उपयोग करत आहे. डोकं लढवण्यापेक्षा बोटं फिरवणे सोप्पं वाटतं. सगळंच फास्ट आणि इन्स्टंट हवं या नादात आपली मुलं खूप काही गमावत आहेत याचं भान पालकांनीही ठेवायला हवं.
The disease called screen time | सुरवंटाची अळी जशी स्वतःभोवती कोश तयार करून घेते तसा हा आभासी दुनियेचा कोश मुलांभोवती तयार होतोय. पण एक दिवस सुरवंटाची अळी त्या कोशातून बाहेर पडते आणि ती सुंदर, मनमोहक असे रंगीबेरंगी फुलपाखरू बनते. तसंच मुलांनीही आभासी जीवघेण्या स्पर्धेच्या कोशातून काही वेळ तरी बाहेर पडावं आणि दिवसातून एक तास तरी किमान मोकळ्या हवेत खेळावं. रंगीबेरंगी फुलपाखराप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे विविधरंगी पैलू उलगडून बालपणाच्या बागेत स्वच्छंद विहरावे. आपले बालपण डिजिटल कोशात गुरफटून न घेता खऱ्या अर्थानि रम्य करावे,
Read More
